श्रीलंकेच्या दोन माजी मंत्र्यांना तुरुंगवास   

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

कोलंबो : २०१५ च्या राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार  प्रकरणात श्रीलंकेच्या एका न्यायालयाने बुधवारी दोन माजी मंत्र्यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.२०१० ते २०१५ पर्यंत क्रीडामंत्री म्हणून काम केलेले महिंदानंद अलुथगामेज यांना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २०२२ ते २०२४ पर्यंत व्यापार मंत्री असलेले नलिन फर्नांडो यांना कोलंबो उच्च न्यायालयाने २५ वर्षांची शिक्षा सुनावली.
 
२०१५ च्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान प्रलोभन म्हणून वाटण्यासाठी बनवलेली क्रीडा उपकरणे खरेदी करून राज्याचे ५३ दशलक्ष लाख रुपयांचे नुकसान केल्याबद्दल या दोघांना दोषी ठरवण्यात आले. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०१४ दरम्यान क्रीडा क्लबना वाटण्यासाठी किमान १४ हजार कॅरम बोर्ड आणि ११ हजार ड्राफ्ट बोर्ड खरेदी करण्यात आले. त्यावेळी फर्नांडो हे सरकारी मालकीच्या घाऊक व्यापार एजन्सीचे प्रमुख होते. 
 

Related Articles